Breaking




आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करा - काॅ. उज्वला पडलवार


आशा व गटप्रवर्तकांचे दुसरे मुखेड तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले


नांदेड : आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांची भूमिका असून केंद्र व राज्य सरकार मागील अनेक वर्षापासून आशा वर्कर यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना शासकीय योजनेत समाविष्ट करण्यासह त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी संघटनेच्यावतीने मार्गी लावू , असे प्रतिपादन सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार यांनी केले. 


दि ५ डिसेंबर रोजी मुखेड येथे आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे दुसरे तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या खुल्या सत्राचे अध्यक्ष सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षा काॅ. उज्वला पडलवार या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष काॅ शिलाताई ठाकूर यांची उपस्थिती होती. या अधिवेशानाचे उद्धघाटन तालुका समूह संघटक शिवदास तोटावाड यांनी केले तर कुष्ठरोग अधिकारी डाॅ.प्रविण खलसे, डिवायएफआय तालुका अध्यक्ष काॅ.अंकुश माचेवाड व एसएफआयाचे जिल्हाध्यक्ष काॅ. विजय लोहबंदे यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी आशा व गटप्रवर्तकांची  नविन मुखेड तालुका कमिटी गठित करण्यात आली. या कमिटीच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी सुनिता तांबुळे तर सचिवपदी रेणुका देवकते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी अनुसया जाधव, उपाध्यक्षपदी सुलोचना पोतदार, जयश्री गवाले, गंगासागर कावळगावकर, गवळण करडखेले, सुरेखा नामेवार यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी बेबीताई मालूसरे, सहसचिव पदी मंगलताई तोटरे, महानंदा साखरे, शर्मिला जाधव, राजेश्वरी अंजागौड, शोभा कुद्रे, सिमा कुलकर्णी, रतन बामणे आदींची नविन तालुका कार्यकरणी निवडण्यात आली.


हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी हाणमंत देशमुख, संजय शिंदे, सुनिल कुलकर्णी, विश्वंभर कुंभारे, कैलास बासटवाड, श्रीरंग सुर्यवंशी, किशनराव करटखेले यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा