Breakingपुणे : किल्ले शिवनेरीवरील ढासळणाऱ्या दरवाज्याची डागडुजी करण्याची मागणी


जुन्नर : किल्ले शिवनेरी वरील ढासळणाऱ्या हत्ती दरवाज्याची डागडुजी व गडावरील इतर महत्वाच्या कामांच्या संबधी खासदार अमोल कोल्हे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक श्रीमती व्ही. विद्यावथी यांची भेट घेतली.


यावेळी गडावरील विविध कामांची टेंडर प्रक्रिया रद्द करू नये तसेच पाच महिन्यांपूर्वी मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी केली. यास श्रीमती विद्यावथी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, असल्याचे खा. कोल्हे म्हणाले. 

त्यामुळे लवकरच हत्ती दरवाजाची डागडुजी होईल व गडावरील कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा