Breakingदापोली नंबर 1 मराठी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा


दापोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित, दलितांचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस  महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. दापोली नंबर 1 या मराठी शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शाळेत सकाळी ठीक 8 वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर अश्विनी करंदीकर यांच्या हस्ते हार अर्पण करून  कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्प अर्पण करून पूजन केले. 


वरद शहा इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भाषण केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना उपयुक्त अशी राज्यघटना लिहिली. खूप अभ्यास पूर्वक कलमे लिहली. ते दिवसांतून 18 ते 20 तास अभ्यास करत होते. त्यांनी लिहलेली राज्यघटना आजसुद्धा आहे तशीच आहे. त्या घटनेनूसारच आपल्या देशाचा कारभार चालतो. आपल्याला मतदानाचा अधिकार राज्यघटनेमुळे मिळाला आहे. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूदिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो.या महामानवास कोटी कोटी नमन. अशा शब्दांत शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.

लहानपणापासूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर खूप हुशार होते. ते दिवसांतून 22 तास अभ्यास करत होते. त्यांचे वाचन चांगले होते. एकदा वाचलेले ते विसरत नव्हते. त्यांनी अस्पृश्यता, सती प्रथा, अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी काम केले. दलितांना पाणी मिळवून देण्यासाठी चवदार तळे महाड येथे सत्याग्रह केला. दलितांना आपले हक्क व अधिकार मिळवून दिले. असे मनोगत  शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. पिंगला रावताळे यांनी व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर, पदवीधर शिक्षिका सौ.विद्या मुरूडकर, स्वाती खानविलकर, श्रीम.पिंगला रावताळे आदि शिक्षक वृंद व रिहान मलबारी, रजान मलबारी, वरद शहा, हिमांशू नवरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा