Breakingडिजिटल अल्गोरिदमला वर्तमानपत्रे हाच विश्वासार्ह पर्याय - डॉ. सुरेश बेरी


पिंपरी चिंचवड : डिजीटल अल्गोरिदमला वर्तमानपत्रेच पर्यायी ठरत आहेत. तर इंटरनेट हा दुवा असल्याचे मत डॉ. सुरेश बेरी यांनी शनिवारी चिंचवड येथे व्यक्त केले. 


जेष्ठ विचारवंत डॉ.सुरेश बेरी  म्हणाले, वर्तमानपत्रातील माहिती ही विश्वासहर्तेला धरून असते. त्यामुळे त्या माहितीचे मूल्य अमूल्य असते. वर्तमानपत्र वाचनाने माणूस घडत असून डिजीटल क्रांतीत वर्तमानपत्राचं महत्त्व कमी होत असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केले.

इंटरनेटला २५ वर्षं झाली आहेत. लिहून येतं आहे. इंटरनेटमुळे अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक बदल झाले. वृत्तपत्रव्यवसायही ह्याला अपवाद नाही. गेल्या काही वर्षांत पाश्चात्य देशांतल्या वृत्तपत्रव्यवसायापुढे इंटरनेटमुळे जीवनमरणाचाच प्रश्न उभा झाला आहे. आपल्याकडे त्यासंबंधात काही बातम्या येऊन जातात. इंटरनेटवरच्या आणि इतर प्रसारमाध्यमांमधल्या मतांच्या गलबल्यात खात्रीलायक आणि नि:पक्षपाती पत्रकारिता  करून लोकशाही जिवंत ठेवणारी पत्रकारिता फक्त वर्तमान पत्रामध्येच असते. समाजातील मूलभूत समस्या आणि प्रश्नांची अभासपूर्ण माहिती वर्तमानपत्रामध्येच असते. त्यामुळे डिजिटल अल्गोदिरामला वर्तमानपत्रेच पर्याय असेल इंटरनेट हा फक्त दुवा आहे. विश्वासार्ह पत्रकारिता आज देखील हवी आहे, असे डॉ. बेरी यांनी म्हटले आहे.

स्वयंसिध्दा प्रतिष्ठान आणि प्रतिभा महाले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिध्दा पुरस्कार वितरण सोहळा झाला. जेष्ठ साहित्यिका अंजली कुलकर्णी व कायदे सल्लागार रमा सरोदे यांना पुरस्काराने सन्मानित केले. इंटरनेट युगातील वर्तमानपत्राचे महत्त्व या परिसंवादात डॉ. बेरी बोलत होते. 

या वेळी प्रतिभा महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र कांकरिया, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी स्वयंसिध्दा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, दै. सकाळचे उपसंपादक पितांबर लोहार, नंदकुमार मुरडे, डॉ क्षितीजा गांधी, रुपा शहा वर्षा बालगोपाल आदी उपस्थित होते. 

विवेक इनामदार यांनी डिजीटल माध्यमांचे महत्त्व सांगत ई-पेपर, न्यूज पोर्टल्स याचे दाखले दिले. सद्दविवेक बुध्दीला जागृत ठेवत बातम्या वाचण्याचा सल्ला दिला. पितांबर लोहार यांनी पुराणकाळातील दाखले देत वर्तमानपत्रांचे महत्त्व विशद केले. वर्तमानपत्र व इंटरनेट हे एकमेकांस पुरक असल्याचे सांगितले. डॉ. कांकरिया म्हणाले, तरूणांनी वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत. आधीच्या पिढीची सुरूवात वर्तमानपत्रे वाचून होते तर आताच्या पिढीची सुरूवात मोबाईलच्या मॅसेजने होते. 

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, सुरेश कंक, राज अहेरराव, प्रदीप गांधलीकर, प्रकाश निर्मळ, राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, आत्माराम हरे, नीलेश शेंबेकर, अभिजीत काळे, ही आणि इतर साहित्यिक मंडळी आवर्जून उपस्थित होती.   

सुभाष चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले.  सारिका माको़डे यांनी सुत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर भंडारे यांनी आभार मानले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा