Breaking
....आता लढाई कामगार विरोधी कायद्याची - काशिनाथ नखाते


शेतकरी जिंकले ...आता कामगारही मिळून लढतील 


पिंपरी : देशभरातल्या शेतकऱ्यानीं  एक वर्षाच्या प्रखर आंदोलनानंतर शेतकरी विरोधी कायदे केंद्र शासनाने मागे घेतले यातुन देशभरातील  आंदोलनाला दिशा मिळाली आहे .याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन करत असताना आता पुढील लढाई कामगार विरोधी चार कायदे लादले ते रद्द करण्यासाठी लढाई देशभरामध्ये सुरुवात झालेली आहे, यास सज्ज राहा, असे आवाहन कामगार नेते तथा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी  व्यक्त केले.

काळेवाडी फाटा येथे कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे शेतक-यानी एक वर्षाच्या लढाईतुन शेतकरी विरोधी कायदे रद्द करुन घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदनाचा ठराव आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधातील लढाईची सुरुवात आज करण्यात आली.

यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, उपाध्यक्ष राजेश माने, मुख्य निमंत्रक सलीम डांगे, अशोक जाधव, बळवंत चव्हाण, योगेश भोई ,कमल लष्करे, बाळू तावडे, सलीम उस्मानी, संगीता ढेरे, रवींद्र पाटील आदिसह शहरातील विविध भागातील कष्टकरी कामगार उपस्थित होते .


याप्रसंगी नखाते म्हणाले "शेतकरी कायदे रद्द केल्याने भारतभरात एक वर्ष चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. या लढ्यात सुमारे ७०० शेतकरी हुतात्मे झाले. आंदोलनकर्त्यांना हिनवण्यात आले, अपमान केला, लखीमपूर खेरी घटना देश विसरणार नाही .

शेतीमालाला आणि सर्व शेतकऱ्यांना लाभदायक किंमतीची हमी देणारा केंद्रीय कायदा करावा ही मागणी पुर्ण होईलगेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकारने कामगारांच्या अधिकारांवर सतत आघात केले आहेत. कामगारांच्या सुरक्षेसाठी, मालकांच्या व भांडवलदारांच्या नफेखोरीवर वचक ठेवण्यासाठी बनवलेले, कामगारांनी संघर्ष करून बनवून घेतलेले असे अनेक कायदे पूर्णपणे रद्द केले आहेत व ह्या कायद्यांमध्ये कामगारविरोधी “सुधारणा” केल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील कामगारांवर आलेल्या महाकाय संकटाचे संधीत रूपांतर करून मोदी सरकारने ४४ कामगार कायदे रद्द करून त्यांच्या जागी चार लेबर कोड (श्रम संहिता) संसदेत मंजूर करून घेतले .मोदी  सरकारने कामगारांच्या अधिकारांवर सतत हल्ला केला आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी, मालकांच्या व भांडवलदारांच्या नफेखोरीवर वचक ठेवण्यासाठी बनवलेले, कामगारांनी संघर्ष करून कायदे बनवून घेतलेले असे अनेक कायदे पूर्णपणे रद्द केले आहेत. विदेशातील कामगारांची घोर फसवणूक आहे, ज्याप्रमाणे शेतकरी पेटून उठला त्याप्रमाणे देशातील कामगार पेटून उठलेला आहे आणि हे कामगार कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत ही लढाई अशीच सुरू राहील, असा इशारा नखाते यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा