Breaking
पिंपरी चिंचवड : लमाण, पारधी तांड्यावर साडी चोळी वाटप


पिंपरी चिंचवड : रहाटणी शास्त्रीनगर येथील लमाण, पारधी, वडार समाज यांच्या पालावर  वुई टूगेदर फाउंडेशन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ५० कुटुंबातील स्त्री, पुरुष, मुले, मुली यांना साड्या, शर्ट, पॅन्ट, मुलींचे ड्रेस यांचे वाटप केले.


ऊसतोडणी, मातीकाम, नाका मजुरी ई प्रकाराची कामे करून भटक्या जमातीतील ही गरीब कुटुंबे नखातेवस्ती येथे गुजराण करत आहेत.


चिंचवड येथील शिक्षक दाम्पत्य प्रा.दिपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड यांच्या हस्ते महिला, मुलीं, पुरुष यांना वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद, खजिनदार सोनाली मन्हास सह शेहेनाज शेख, सलीम सय्यद, दिलीप पेटकर, गौस सय्यद, सदाशिव गुरव हे या कार्यक्रमात सहभागी होते. सामाजिक कार्यकर्ते शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सचिन तेलंगे यांनी प्रस्ताविक केले.

गणेश केदारी, रामदास झगडे, स्वप्निल फरताडे, किरण थोरात, मुन्ना ढमाले, नंदू मोरे, अशोक तेलंगे, मुन्ना ढवारे, कैलास डुकळे, रामदास दगडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा