Breaking
पिंपरी चिंचवड : कळस, येरवडा, रमाबाई आंबेडकर नगर येथे मातीकाम कामगारांना शिधा वाटप


पिंपरी चिंचवड : येथील विप्ला फाउंडेशन आणि एच एस बी सी टेक्नॉलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कळस, येरवडा या परिसरात भांडी कुंडी विकणाऱ्या, तसेच बांधकाम साईटवर दगड, वीट, मातीकाम मजुरी करणाऱ्या ५२० कुटुंबाना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक किटचे वितरण संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रविण कदम प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.


संस्थेच्या प्रा.वैशाली गायकवाड यांनी सांगितले की, उपेक्षित वस्तीतील १८ ते ३० वयोगटातील युवती महिलांना संगणक, व्यवसाय प्रशिक्षणाचे (RETAIL, BPO) कोर्स पुणे आणि पिंपरी येथे सुरू केलेले आहेत. त्यांना किमान उत्पन्नाची हमी देणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, आणि त्यांचे सक्षमीकरण केले जाते.

प्रा. दिपक जाधव यांनी सांगितले की, कच्च्या घरात निवास करणाऱ्या दुष्काळी प्रदेशातील भूमिहीन मजुरांना सध्या पुरेसे काम नाही, त्यांची आर्थिक स्थिती महामारीच्या काळापासून खराब झाली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विशेष सहाय्य देत आहोत. त्याच बरोबर केंद्र राज्य सरकारच्या विविध आर्थिक सहाय्याच्या योजनाची माहिती त्यांना दिली जाते. या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमाचे संयोजन निलेश शिंदे, संतोष जाधव, वैशाली भांडवलकर यांनी केले.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा