Breaking
पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध


पिंपरी चिंचवड : कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाही फेकून केलेल्या विटंबनाच्या निषेधार्थ तसेच कर्नाटक मधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांने जे वक्तव्य केले. त्याच्या विरोधात काळेवाडी रहाटणी शिवसेना विभागच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.


या आंदोलनात पिंपरी-चिंचवड सहसंपर्कप्रमुख वैभव थोरात, शहरप्रमुख अँड. सचिन भोसले, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, सुधाकर नलावडे, चिंचवड महिला आघाडीप्रमुख शारदा वाघमोडे, रहाटणी विभागप्रमुख शिल्पा आनपन, भाग्यश्री म्हस्के, सविता सोनवणे अमृता सुपेकर, करुणा माने, तसलीम शेख 

विभागप्रमुख गोरख पाटील, रहाटणी श्रीनगर विभागप्रमुख प्रदिप दळवी, अंकुश कोळेकर, अरुण हमुनाबाद, हनुमंत पिसाळ, शाखाप्रमुख नरसिंग माने, प्रहारचे संजय गायके, सावता महापुरे, रविकिरण घटकार,सागर शिंदे,कानिफनाथ तोडकर, दत्ता गिरी उपविभाग प्रमुख अनिल पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेनेच्या आजी - माजी महिला व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सहसंपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी आपल्या भाषणात कर्नाटक सरकारचा तीव्रपणे जाहीर निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या समाज कंठकाला शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर असाच चालू राहिल, असेही थोरात म्हणाले.

कार्यक्रमाचे नियोजन काळेवाडी विभागप्रमुख गोरख पाटील,रहाटणी विभागप्रमुख प्रदीप दळवी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा