Breaking
रविवारी पिंपरीमध्ये 'एलजीबीटीक्यू'ची अभिमान पदयात्रापिंपरी चिंचवड : समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी आणि दविलिंगी (LGBTIQ) समूहाबद्दल समाजामध्ये जागरूकता आणि स्वीकार्यता वाढावी त्याच बरोबर या समूहातील व्यक्तींचे न्याय्य हक्क कायद्याने मान्य व्हावेत यासाठी अभिमान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी भा. दं. सं. ३७७ कलमावर ऐतिहासिक निकाल देऊन प्रौढांनी संमतीने केलेले समलिंगी संबंध गुन्हयाच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आनंद व्यक्त करण्यासाठी ही अभिमान पदयात्रा 'युतक' या ग्रुपने रविवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत पिंपरी येथे आयोजित केली आहे, अशी माहिती 'युतक' अनिल उकरंडे यांनी दिली.


या पदयात्रेची सुरुवात लिनियर गार्डन पासून सुरू होऊन भोसरी - वाकड़ रस्त्याने पुढे शिवार चौकच्या दिशेने पदयात्रा जाऊन पुन्हा मूळ ठिकाणी ही पदयात्रा संपणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा