Breakingपुणे : धुक्यात हरवली सुंदर सकाळ, मावळ मध्ये महाबळेश्वरचे दर्शन


मावळ : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हवेतील गारव्यामुळे कान्हे मावळ व कामशेत शहरात पहाटेच्या वेळी दाट धुके पसरले होते. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान धुक्‍याचे प्रमाण वाढत गेले.


कान्हे येथील महिंद्र सी आय ई कंपनीत कामावर जाताना राजू सुतार यांनी कंपनीच्या परिसरातील सकाळची धुक्याची चादर पांघरलेल्या निसर्गाचे टिपलेले विलोभनीय क्षण मनाला मोहवून टाकत आहेत. जणू काही मावळ खोऱ्यात महाबळेश्वरचे स्वरूप दृष्टीस पडत आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा