Breaking







'मी मुलगी आहे, वस्तु नाही' म्हणत IAS तरूणीने कन्यादानाचा विधी धुडकावला


न्यूज डेस्क : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील जोबा गावात महिला आयएएस अधिकारी आणि आयएफएस अधिकाऱ्याचं लग्न चर्चेत आहे. आयएएस तपस्या परिहार हिने यूपीएससी परीक्षेत 23 वा क्रमांक पटकावला आहे. तिने IFS अधिकारी गरवित गंगवार यांच्याशी विवाह केला. मात्र सध्या तपस्या परिहारच्या लग्नाची खूप चर्चा आहे.


तपस्या यांच्या लग्नाची चर्चा होतेय कारण तिने कन्यादान करण्याच्या प्रथेला नाकारलं. तपस्याने तिच्या वडिलांना सांगितले आहे की, मी दान करण्याची गोष्ट नाही, मी तुमची मुलगी आहे." यानंतर लग्नात कन्यादानाचा सोहळा पार पडला नाही. गुरुवारी जोवा गावात लग्नाचे रिसेप्शन पार पडले. यावेळी दोन्ही बाजूचे नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती.


महिला आयएएसने लग्नात कन्यादान करू दिलं नाही . हिंदू संस्कृतीत कन्यादानाला विशेष महत्त्व आहे, मात्र नरसिंगपूर जिल्ह्यात जन्मलेल्या तपस्या परिहारने सर्व बंधनं तोडून आपल्या लग्नात कन्यादानाचा सोहळा होऊ दिला नाही. त्यामुळे हा विवाह सध्या चर्चेत आहे. 

आयएएस अधिकारी तपस्या सांगतात की, लहानपणापासूनच समाजाच्या या विचारसरणीचा विचार करायचे की, मुलीचे कोणी इच्छेशिवाय कसं दान करू शकतं. हळुहळू मी माझ्या घरच्यांशी याच विषयावर चर्चा केली आणि घरातील सदस्यांनीही यावर सहमती दर्शवली. मग यासाठी वराची बाजूही पटवून घेण्यात आली आणि मुलगी न देता विवाह पार पडला.

IAS तपस्या परिहार सांगतात की, जेव्हा दोन कुटुंब मिळून एकत्र लग्न लावतात, तेव्हा मोठं, लहान किंवा उच्च-नीच असणं योग्य नाही. कोणी दान का करावं आणि लग्नासाठी तयार झाल्यावर घरच्यांशी चर्चा करून कन्यादानाची विधी लग्नापासून दूर ठेवली.

तपस्याचा पती आयएफएस गर्वित सांगतात की, लग्नानंतर मुलीला पूर्णपणे का बदलावं लागतं. मग तो कुकंकू भरण्याचा विषय असो की मुलगी विवाहित असल्याचं सिद्ध करणारी कोणतीही परंपरा असो. अशा विधी मुलासाठी कधीही लागू होत नाहीत आणि आपण अशा विधी हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा