Breakingखेळाडू दत्ता घुले यांना उत्कृष्ट सायकल पटू सन्मान


दिघी : भोसरी विधानसभेचे आमदार पै.महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामान नगरसेवक पै.विकास डोळस व युवा नेते कुलदिप परांडे यांच्या संकल्पनेतुन तसेच कमल राज ग्रुपच्या सौजन्याने दिघीतील नागरिकानां खुल्या व्यायम साहित्य ( ओपन जिम ) चे लोकार्पण सोहळ्या निमित्ताने 'उत्कृष्ट सायकल पटू खेळाडू सन्मान' पिं.चि.मनपा उपमहापौर हिरा घुले यांच्या शुभ हास्ते देण्यात आला. 


यावेळी ह.भ.प. दत्ता आबा गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी सैनिक कॅपटन अशोक काशिद आदी मान्यवर उपस्थीत होते.

दत्ता घुले म्हणाले, आज खुप आनंद होत आहे, माझ्याच गावा मध्ये माझा सायकलपटू म्हणुन सन्मान होत आहे. हा सन्मान माझे मार्गदर्शक गुरुवर्य आजोबा कै.ह.भ.प.विठ्ठल घुले यांना समर्पित करत आहे.

दिघी मध्ये ओपन जिम मुळे नागरिकांना शारिरीक व्यायाम करण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी मोठे खुले व्यासपीठ तयार झाले आहे. यामुळे तरुणांपासून ते जेष्ठांपर्यत सर्वानां याचा लाभ घेता येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा