Breaking
जुन्नर : मुलींच्या पाठलागप्रकरणी दोघांना अटक


जुन्नर : शाळेत जाताना व घरी येताना दोन अल्पवयीन बहिणींचा मोटार सायकलवरून पाठलाग करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वारंवार गैरवर्तन करणाऱ्या दोन तरुणांना जुन्नर पोलिसांनी अटक केली. याबाबतची माहिती विकास जाधव यांनी दिली.


याबाबत मुलींच्या आईने तक्रार दिल्यानंतर जुन्नर पोलिसांनी नीलेश होनाजी लांडे व अक्षय सुभाष रेंगडे दोघे ( रा . गोद्रे , ता . जुन्नर ) यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा