Breakingआदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, ...अन्यथा तीव्र आंदोलन


अहमदनगर : हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक याने दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण केली, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 


डॉ. अजित नवले म्हणाले, "हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन जमीन कसणाऱ्या आदिवासी व दलित शेतकऱ्यांवर वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण केली. अनेक शेतकऱ्यांना जखमी करण्यात आले. संघटीत हल्ला करून शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. किसान सभा या घटनेचा निषेध करते."

ते पुढे बोलताना डॉ. नवले म्हणाले, "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला किमान 10 लाखाची मदत करा. आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा व त्यांना कठोर शिक्षा करा, आत्महत्या झालेल्या कुटुंबातील किमान एका सदस्याला कायम सरकारी नोकरी द्या, कसत असणाऱ्या सर्व जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा. कसत आलेल्या वन जमिनी बागायती करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत या शेतकऱ्यांना प्राधान्याने अनुदान उपलब्ध करून द्या, अन्यथा किसान सभा महाराष्ट्रभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला आहे.


तसेच दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने किसान सभेचे राज्य कौन्सिलचे सदस्य अंकुश बुधवंत, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली जिल्हा सचिव सुरेश काचगुंडे, किसान सभेचे हिंगोली तालुका अध्यक्ष रुस्तुम राठोड, सुदाम जाधव, सुरेश आप्पा आडळकर व इतर कार्यकर्त्यांनी पातोंडा गावातील या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली आहे.

आगामी काळात या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी किसान सभा संपूर्ण ताकदीने या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील असा विश्वास दिला, असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा