Breaking


पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते आजी विद्यार्थ्यांना शिबिरातील सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप


दापोडी : जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती. सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दापोडी, पुणे-१२ राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दावडी ता‌ .खेड. जि. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील माजी ( N. S. S. ) विद्यार्थ्यांच्या हस्ते शिबिराचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला.


माजी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये मनोज सुरवसे, संकेत सोहनी, अजय जाधव, कल्याणी जाधव, यांच्या हस्ते२०२१-२२ मधील शिबिरात सहभागी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (आजी) विद्यार्थ्यांना शिबिरातील सहभागाचे प्रमाणपत्रदेण्यात आली.


या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी, प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सिद्धार्थ कांबळे. व शिबिरातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


शिबिरातील या सहभागाच्या प्रमाणपत्राचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल विविध ठिकाणी उपयोग होणार आहे.


याशिवाय या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात शिबिरामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, आमचे व्यक्तिमत्व विकसित झाले, श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली, सामाजिक प्रश्‍नांची जाणीव निर्माण झाली, स्वावलंबनाचे शिक्षण मिळाले, कलागुणांना संधी मिळाली, अशा प्रतिक्रिया याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.


कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार प्रा. सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा