Breaking
BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला


318 रुपयात 84 दिवस - बीएसएनएल सुसाट 


नवी दिल्ली : भारतातील एअरटेल, जिओ आणि व्ही म्हणजे व्होडाफोन- आयडीया या सारख्या खासगी टेलिफोन कंपन्यांनी पोस्ट पेड, प्रीपेड प्लॅन सरासरी 20 टक्क्यांनी वाढवले, या तिन्ही कंपन्यांनी संगनमत करून केलेली दरवाढ ग्राहकांचा खिसा कापणारी ठरत आहे.

खाजगी कंपन्यांनी प्रीपेड दरवाढीबरोबर एसएमएस सेवा महाग केली आहे. या सेवेचा दर 149 च्या पुढे आहे. किरकोळ प्रेपेड सेवेमधील पूर्वीची एसएमएस सेवा रद्द करण्यात आली आहे. पोस्टपेड सेवेचे किमान दर दुप्पट केले आहेत. मागील सात वर्षात खाजगी कंपन्यांनी सुरवातीला बीएसएनएलचे मार्केट संपवण्यासाठी अतिशय स्वस्त आणि आकर्षक डेटा चे प्लॅन दिले होते. त्यामुळे बीएसएनएलचे देशातील हजारो ग्राहक जिओ, व्होडाफोन, एअरटेल कडे वळले होते.


मोदी सरकारच्या काळात या कंपनीचा (BSNL) तोटा वाढत गेला. याचाच फायदा घेऊन कार्पोरेट उद्योगपतींच्या या कंपन्यांनी एकमत करून नोव्हेंबर 2021 पासून दरवाढ सुरू केली. दरम्यान या खाजगी कंपन्यांशी  स्पर्धा करण्यासाठी  बीएसएनएलने मार्केट मध्ये पुन्हा ग्राहकाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.

आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत या योजनेचा सर्वांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास बीएसएनएलने व्यक्त केला आहे. बीएसएनएल ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे जिने आपल्या प्रीपेड योजनांच्या किमती सध्या वाढवल्या नाहीत. इतर सर्व खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यामुळे सरकारी दूरसंचार आणि सर्व खाजगी ऑपरेटरद्वारे ऑफर केलेल्या प्रीपेड योजनांच्या किमतींमध्ये लक्षणीय अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे, बीएसएनएलकडे आता केवळ किमतीच्याच नव्हे तर ऑफर केलेल्या फायद्यांच्या बाबतीतही 28 दिवसांची वैधता योजना आहे.


28 दिवसांची वैधता

हा प्रीपेड पॅक सध्या Jio, Airtel आणि Vi ला मागे टाकतो आहे, कारण BSNL 187 रुपयांचा प्लॅन ऑफर करते ज्याची वैधता 28 दिवस आहे. ही योजना वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा देते, FUP मर्यादा संपल्यानंतर, डेटा गती 80 Kbps पर्यंत खाली येते. यासोबतच यूजर्सना दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते.

बीएसएनएलचा हा नवा प्लॅन 318 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधतेसह 168 जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन म्हणजे एक डेटा STV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर) आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीडमध्ये घट होते आणि 40 Kbps स्पीड मिळतो.


ग्राहकांनी आता खाजगी कंपन्यांच्या सेवा

बीएसएनएल मध्ये पोर्ट करायला सुरुवात केली आहे. बीएसएनएल च्या ग्राहकसेवा केंद्रामध्ये नवी सिमकार्ड सहज उपलब्ध होत आहेत. बीएसएनएल च्या सर्व ऑफर्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा