Breaking

ब्रेकींग : शाळा पुन्हा सुरू होणार, असे असतील शाळा सुरू करण्याचे अधिकार !


मुंबई : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. 


कालच त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजूरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारीपासून शाळा सुरू होतील. 


शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करून निर्णय घेतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होतील. पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरू होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

- पूर्णपणे काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार

- पालकांची समंती असल्यानंतरच विद्यार्थी शाळेत येतील.


- निवासी शाळांच्या बाबत निर्णय नंतरच

- कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवरच.

- विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु करणार.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा