Breakingब्रेकिंग : राज्यातील महाविद्यालय १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार, मंत्री उदय सामंत काय म्हणाले पहा !

 


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.


उदय सामंत काय म्हणाले ?


- राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.


- दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार.


- परिक्षा ही ऑनलाईन होणार.

 

- काही कारणास्तव विद्यार्थी ऑनलाईन परिक्षांना उपस्थित न राहिल्यास पुन्हा परिक्षेची संधी देण्याच्या सूचना.


- महाविद्यालयांना व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश.


- महाविद्यालयांची विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना.


- विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना.


- ५० टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरू राहणार.

1 टिप्पणी:

  1. COVID chi Las compulsory nahi asa supreme court ha aadesh Astana punha dos compulsory kashasathi ki deshat supreme court preksha ya fermasutical company's che aadeshach mahtvache aahet

    उत्तर द्याहटवा