Breaking

सुगत प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी


मुंबई : सुगत प्रकरणातील आरोपींना अटक करा , या व अन्य मागण्यांसाठी दलित पॅंथर सुवर्णमहोत्सव समिती आणि  जाती अंत संघर्ष समिती च्या पुढाकाराने विविध आंबेडकरी, समतावादी, पुरोगामी युवा, महिला, कामगार संघटनांनी केईएम हॉस्पिटल समोर " मूक निषेध निदर्शने " केली. 


आंदोलनाच्या मागण्या खालीलप्रमाणे : 

१. सुगत प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक करा. 


२. केईएम हॉस्पिटल डीन डॉ. हेमंत देशमुख आणि ॲकॅडमिक डीन डॉ. नाडकर यांना ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार सह आरोपी करा. 

३. ॲकॅडमिक डीन व सर्व वॉर्डन ना त्वरित निलंबित करा. 

४. प्रकरण दडपणाऱ्या पोलिसांनाही, सह आरोपी करा. 

५. पिडीत सुगत पडघनला पोलीस संरक्षण द्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा