Breakingरामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश


पुणे
 :  नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड माध्यामिक महाविद्यालयाने  शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामधे कु.वरद संतोष पोतदार 274 / 300 मिळवून राज्याच्या गुणवंत यादीत 10 वा क्रमांक पटकावला. तर कु.शिवम राजाराम खाडे  ( 264 / 300 ), ओमकार  उमाकांत जानापुरे ( 240 / 300 ), कु. सोहम दिपक राऊत ( 236 / 300 ) तसेच  कु. अक्षदा रामदास पवार ( 218 / 300 ) यांनी तालुकास्थरावर अनुक्रमे 26 वा, 136 वा, 158 वा, 303 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड, अध्यक्ष विनायकराव वाळके, सचिव रविंद्र गायकवाड यांनी गुणवंत विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षक याचे सत्कार करत  अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यवस्थापिका उषा पाटील , नवजीवन पोर्ट फाउंडेशन चे अध्यक्ष उदय गायकवाड, प्राचार्य विनोद वाळके, पर्यवेक्षिका मंगल भोसले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा