Breaking
दिघी : सिंधुताई सपकाळ यांना शोकसभेत आदरांजली !


दिघी : 'सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत दिघी विकास मंचातील सदस्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या.


सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही.


दिघी विकास मंचाच्या वतीने माईंच्या प्रतिमेस मेनबती लावून व  पुष्प फुल अर्पण करुन  श्रद्धाजंली वाहण्यात आली.


या प्रसंगी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, के.के.जगताप,  राजेंद्र राऊत, धनाजी खाडे, दत्ता घुले, विकी अकुलवार, किशोर ववले, 

पुंडलिक सैंदाणे, पांडुरंग म्हेत्रे, प्रशांत कुर्हाडे, कुंडलिक आदक मोहन कांबळे, अभिमन्यु  दोरकर , स्वाती लबडे, सुरेखा मेहत्रे, प्रतिभा दोरकर, अश्विनी कांबळे, शोक सभेचे सुत्रसंचालन सुनिल काकडे यांनी केले तर नामदेव रढे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा