Breaking

नारायणगाव रोटरी क्लबच्या वतीने 51 कुटुंबांना किराणा किटचे वाटप


जुन्नर, ता.23 : जुन्नर तालुक्यातील पाडळी गावातील माणिकडोह आय टी आय जवळील कातकरी वस्तीतील 51 कुटुंबांना रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले.


मकर संक्रांतीचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने "रोटरी हळदी-कुंकू" कार्यक्रमानिमित्त आदिवासी भागातील कातकरी समाजातील गरीब, गरजू कुटुंबाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकच्या वस्तू न देता जीवनावश्यक किराणा किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू, बाजरी, तांदूळ, गूळ, शेंगदाणे, पोहे, चहा पावडर, साबण, बिस्किटे आदी वस्तू वाण स्वरूपात देण्यात आल्या. 

 

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा


याप्रसंगी अध्यक्ष मंगेश मेहेर, फर्स्ट लेडी निर्मला मेहेर, अनुपमा ब्रह्मे, शशिकला भराडीया, माधुरी कुलकर्णी, रेखा ब्रह्मे, रिनाली वामन, अमृता भिडे, मंजूश्री लोखंडे, प्रिया घोडेकर, छाया गायकवाड, सिमा महाजन, निशा बांदिल, प्रिया कामत, सुनिता वाघ तसेच रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे नियोजन धनश्री बेनके, डॉ.सुषमा कुलकर्णी, गीता डोके, मीना शेवाळे, सुनिता बोरा, डॉ. केतकी काचळे, डॉ.सविता भोसले, डॉ.अनिता उदमले, प्रियांका बोरकर, वर्षा गांधी, स्मिता मुंडे, अश्विनी वाजगे, पल्लवी बांगर, वंदना पटेल, तेजश्री वालझाडे, अमृता जुन्नरकर, बांगा भाभी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन घोडेकर यांनी केले तर प्रा.डॉ.लहू गायकवाड यांनी आभार मानले.


बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती !


केंद्र सरकारच्या खर्च विभागाच्या 590 जागांवर भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा