Breaking


अहमदनगर : डॉ. कलाताई जोशी स्मृती करंडक राज्यस्तरीय वाचाकौशल्य आणि अध्यापन कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सपन्न


अहमदनगर : दरवर्षी २१ जानेवारी रोजी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा कै. डॉ. कलाताई जोशी यांच्या जयंतीदिनी कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वाचाकौशल्य चित्रवाचन आणि कर्णबधिर क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्य स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धा कोविड -१९ मुळे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आल्या. या स्पर्धेस राज्यभरातून विशेष शाळांतील ८७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 


या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विजेत्यांना व शिक्षकांना समारंभपूर्वक शुक्रवार दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १२.०० वाजता विद्यालयात गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे हे होते. वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता दिनकर नाठे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, डॉ. ओजस जोशी, डॉ. जयंत क्षीरसागर, रश्मीताई पांडव हे संस्था पदाधिकारी हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालय व संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी घेतला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात राधाकिसन देवढे म्हणाले की, विशेष गरजा असणा-या या विद्यार्थ्यांनाकरीता अध्यापन तंत्र विकसीत करणे नवनवीन साधनांचा उपयोग करुन ज्ञान देणे आवश्यक आहे. व त्यादृष्टीने विद्यालय आयोजित करत असलेल्या या स्पर्धा फार उपयुक्त आहेत. या स्पर्धेच्या निमीत्ताने दिव्यांग क्षेत्रातील शिक्षकांनी शैक्षणीक व्हीडीओ निर्मीती करतांना दृकश्राव्य माध्यमाचा खुप चांगला उपयोग केला आहे. सर्व यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन केले. आपल्या हातून कर्णबधिरांची उत्कृष्ट सेवा घडो. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या वाचाकौशल्य स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ वयोगटनिहाय पुढीलप्रमाणे वयोगट ९ ते १२ कु. साक्षी हरी फटांगडे, नाशिक कु. अवंतिका संदीप कदम, इस्लामपूर, जि. सांगली, कु. वेदांती विठ्ठल कर्पे औरंगाबाद, कु. झिनत सिकंदर पठाण, पाथर्डी, अहमदनगर वयोगट १२ ते १५ चि. समर्थ संदीप डाके, नाशिक कु. हुदा महेबुब हुसैन, मुंबई कु. साक्षी पांडुरंग रुपनर, इंदापूर, जि. पुणे चि. गणेश हनुमंत भंडारी, पुणे वयोगट १५ ते १८ कु. ईशिका अभिमन्यू गुप्ता, मुंबई कु. साक्षी दत्तात्रय लांडगे, पुणे कु. प्रणिता दिलीप पाटील, इस्लामपूर, जि. सांगली साईराम सुरेश देवकाते, शिर्डी, जि. अहमदनगर असे होते. 

तर शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य व्हिडीओ निर्मीती स्पर्धेतील विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक सरिता सतिश ससाणे, हडपसर कर्णबधिर विद्यालय, पुणे -२८ अनुराधा येनलूरकर, श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, नाशिक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक अमोल आजिनाथ गवारे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे बधिर मूक विद्यालय, बार्शी, जि. सोलापूर असे होते. या स्पर्धेचे परिक्षण सुदेशना राव, पुणे व मोनिका ठाकूर, पुणे यांनी केले. 


सर्व स्पर्धक विजेत्यांचा प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देवून पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय कलाशिक्षक झावरे बी. बी. यांनी करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशेष शिक्षक चौधरी एस. एस. यांनी केले तर आभार कलाशिक्षक भांगरे एस. एच. यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा