Breaking

नाट्य अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध संगीत गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन


पुणे : मराठीतील सुप्रसिद्ध नाट्य अभिनेत्री,अभिनयाने आणि सुरेल गायनाने संगीत रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ  गायिका कीर्ती शिलेदार (वय 70) यांचे आज (शनिवार) दीनानाथ रुग्णालय पुणे येथे निधन झाले. 


पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या.


बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. 


आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने संगीत नाटकांना वेगळ्या उंचीवर नेले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा