Breaking

अबू धाबी विमानतळाजवळ ड्रोनद्वारे हल्ल्यात 3 ठार, भारतीयांचाही समावेश

Photo : Twitter


अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अबू धाबी विमान तळावर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्या करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हाउती संघटनेने घेतली आहे. यात दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले. 

स्थानिक मीडियानुसार, पेट्रोलियम गॅस वाहून नेणाऱ्या तीन टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी ज्वाला पोहोचल्या. मात्र यामुळे विमानतळाचे फारसे नुकसान झालेले नाही. आग किरकोळ होती.  केलेल्या टँकरवरील ड्रोन हल्ल्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा