#DustStorm #SatarkAlert
— Mayuresh Prabhune (@mayureshgp) January 23, 2022
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचले आहे. उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी असून, मुंबई - पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने घेतली आहे. @Indiametdept @iitmpune @NCMR_Pune @scienceccs pic.twitter.com/tKJpp06Pst
पाकिस्तानातील धुळीच्या वादळामुळे मुंबई पुणे मध्ये हवामान बदलले ?
मुंबई : पाकिस्तानातील कराची येथे मोठे धुळीचे वादळ आले होते. शनिवारी सकाळी पश्चिम पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळाने पाकिस्तानच्या कराचीमधील जनजीवन विस्कळीत केले. तिथली दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी झाली होती. मात्र वायव्य भारतात पुढील 36 तास पश्चिम विक्षोभ खूप सक्रिय असल्याने धुळीच्या वादळाचा दिल्लीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
परंतु हे वादळ गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या दिशेने निघाल्यामुळे त्याचा प्रभाव मुंबई, पुणे शहर परिसरात राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सौराष्ट्र किनारपट्टीवर शनिवारी दुपारपासून धुळीचे वारे वाहू लागले आहेत. द्वारका स्थानकाने 400 मीटर दृश्यमानता नोंदवली आहे. पोरबंदर येथे वाऱ्याचा वेग ताशी 10 किमी पेक्षा जास्त होता आणि एक किलोमीटरपेक्षा कमी दृश्यमानता होती.
मुंबईतील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात सकाळीच बोचरी थंडी अधिक जाणवू लागली आहे. हवेमधील धूलिकण वाढल्यामुळे नागरिक, लहान मुले यांना सर्दी, पडसे तापाची लक्षणे वाढली आहेत.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा