Breaking

कोरोना नियमांचे पालन करत राज्यातील शैक्षणिक संस्था त्वरित सुरू करा - एसएफआयची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात नसलेल्या भागात नियमांचे पालन करत शैक्षणिक संस्था त्वरित सुरू करा. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


एसएफआय ने म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. महामारी आज थांबेल, उद्या थांबेल असे करत तब्बल दोन वर्षे उलटून गेली. परंतु महामारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाच्या नावाखाली दोन-दोन वर्षे शैक्षणिक संस्था बंद ठेवणे उचित नाही. या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भरून निघू शकत नाही. परंतू इथून पुढचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करत शासनाने त्वरित शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात.


एकीकडे राज्यातील इतर क्षेत्र सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, प्रवास, बैठका, निवडणुका हे सर्व सुरू आहे. परंतू शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात आल्या. एक वेळेस इतर क्षेत्रातील झालेले किंवा होत असलेले नुकसान येत्या काळात भरून काढता येणे शक्य आहे. पण विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणे शक्य आहे का? हा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजासमोरील मोठा प्रश्न आहे. कोरोनाच्या नावाखाली शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळणे थांबवावे, असेही म्हटले.

निवेदन देतेवेळी उस्मानाबाद जिल्हा कमिटी सदस्य सुदेश इंगळे, डॉ. ओंकार इंगळे हे उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा