Breaking

वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला माजी सरपंचाची बेदम मारहाणसातारा : सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.


जानकर हे स्थानिक वनसमितीचे सदस्य आहेत. त्यांना न विचारता वन मजूरांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेल्याचा राग आल्याने सानप यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेची दखल पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून आरोपीला कठोर कायद्याचा सामना करावा लागणार, अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत. असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा