Breaking

स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन !


नाशिक : स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. द्या सकाळी 10:30 वा संसारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


संसारी ता. जि. नाशिक गावाचे नामदेवराव गोडसे हे समाजकारणात नेहमी अग्रेसर असलेले नामदेवराव शिवराम गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. 


त्याचबरोबर ते इगतपुरी मधील पहिले आमदार कॉम्रेड पूजांबाबा गोवर्धने, माजी आमदार दिवंगत कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड  जेष्ठ नेते एस. एन. डांगे , कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर विविध शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.

कॉम्रेड नामदेवराव गोडसे हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असत. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ते भारतभर विविध कार्यात सहभागी असत. 


आयुष्यभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा कार्यरत असणाऱ्या नेत्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष , किसान सभा आयटक वतीने लाल सलाम ! त्यांचा विचारांचा वारसा शेतकरी कामगार श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणे, मार्क्सवादी, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधान ची मूल्य रुजवण्यासाठी काम करणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशी भावना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य राजू देसले यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा