Breaking


ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'


मुंबई : अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहेत. रिचार्जच्या किमती वाढल्याने दूरसंचार सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना महागाईच्या काळात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु बीएसएनएल ने ग्राहकांसाठी एक विशेष प्लान आणला आहे. 


काय आहे प्लान ?

- BSNL च्या या रिचार्ज प्लानची वैध एकूण 180 दिवसांची आहे. 

- बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची किंमत 699 रुपये आहे. 

- जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये हा प्लान रिचार्ज केला तर तुम्हाला यात एकूण 180 दिवसांची वैधता मिळेल. म्हणजेच एकूण 6 महिने तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय हा प्लान सुरू राहिल.

- प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5Gb डेटा मर्यादा मिळेल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40 kbps होईल. अशा परिस्थितीत या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरता येणार आहे.

- या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळत आहे. याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळेल. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा