Breakingपुणे : मिशन फाॅर व्हिजन फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


पुणे : मिशन फाॅर व्हिजन फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर गायकवाड नगर पुनावळे शिबीर आयोजित करण्यात आले होते.


शिबिरात जनरल तपासणी, हिमोग्लोबीन, शुगर बी. पी., वजन, उंची तपासणी करण्यात आली. तसेच कर्करोग जनजागृती व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. या शिबिरात एकुण १५० कामगारांची तपासणी करण्यात आली. 


शिबिराचे आयोजन बांधकाम सेना च्या संचालिका माधवी शिंदे यांनी केले होते. शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, सचिव अंबादास बेळसांगविकर, खजिनदार तानाजी कसबे, उपाध्यक्ष सागर पोटे, संचालिका डॉ. बीना राजन, सरिता गोळे, सपना कसबे आदींसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा