Breaking

श्री.रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ दि.२१ जानेवारीला किसान सभेचा माहूर मध्ये रास्ता रोको


माहूर : श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह रेणुका मातेच्या पहिल्या पायरी जवळ दि.१० जानेवारी पासून अखंड सुरू आहे.श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथे सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन ची शाखा मागील चार वर्षांपासून कार्यान्वित आहे. तेथील ७० कर्मचाऱ्यांनी या पूर्वी सण २०२० मध्ये २७ ते ३१ जानेवारी असा पाच दिवस बैठा सत्याग्रह रेणुका मातेच्या पायथ्याशी केलेला आहे. तेव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तथा रेणुका देवी संस्थान चे सचिव अभिनव गोयल (भा.प्र. से.) यांनी युनियन चे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांना लेखी आश्वासन देऊन तेव्हा सत्याग्रह थांबविला होता.


तसेच १६ फेब्रुवारी २०२० रोजी विशेष सभा घेऊन संस्थान च्या सर्व कर्मचाऱ्यांना समय वेतन श्रेणी नुसार कायम आदेश देण्यात येतील व किमान वेतनाची  पूर्तता करण्यात येईल अशे सुस्पष्ट शब्दात लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले आहे.


परंतु दोन वर्षे संपून गेली तरीही लेखी आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संस्थानच्या ७० कर्मचाऱ्यांनी पुन्हा दि. १० जानेवारी पासून गडाच्या पायथ्याशी कडाक्याच्या थंडीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. सत्याग्रहाच्या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे. 

खासदार छ. संभाजीराजे यांनी देखील आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन दि.१६ जानेवारी रोजी  कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत, वरिष्ठांकडे प्रश्नमांडतो असे  कर्मचाऱ्यांशी बोलुन धीर दिला आहे. दि.१७ जानेवारी रोजी रात्री उशीरा संस्थान चे सचिव किर्तीकिरण पुजार (भा. प्र. से.) यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असून तुमच्या मागण्या मी चार ते पाच दिवसात सोडविणार आहे, तुम्ही तुमचा सत्याग्रह स्थगित करावा अशी विनंती केली असता संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांनी विचार विनिमय करून चार पाच दिवसात मागण्या सोडविण्यात येत असतील तर आणखी पुढे चार पाच दिवस सत्याग्रह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


एकंदरीतच संस्थान च्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या रास्त असून कायदेशीर आहेत. त्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे म्हणत अखिल भारतीय किसान सभा माहूर तालुका कमिटीच्या वतीने दि.२१ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता रेणुकादेवी रोड टी पॉईंट माहूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

निवेदनाच्या पालक मंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी नांदेड व पोलिस अधिक्षक नांदेड यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.किशोर पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा