Breaking
आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र राजुर कार्यालयाचे व अंकुर प्रि स्कूल चे उद्घाटन


अकोले : आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र राजुर कार्यालयाचे व अंकुर प्रि स्कूल चे उद्घाटन नववर्षात दि. 1 जानेवारी 2022 रोजी राजुर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, श्रमिक मुक्तीदल लोकशाहीवादी चे नेते कॉ. धनाजी गुरव, विद्रोही चळवळीचे नेते कॉ. डॉ. जलिंदर घिगे, विद्यार्थी नेते मदन पथवे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रान कवी तुकाराम धांडे हे होते.


कार्यक्रमाची सुरुवात महामानवाना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना स्वप्निल धांडे यांनी आज पर्यंतची वाटचाल व अभ्यास केंद्राची गरज स्पष्ट केली. 


या अभ्यास केंद्राला जाती धर्माचे बंधन नसून मानवतावादी कोणताही विषय भविष्यात येथे अभ्यासला व चर्चिला जाईल. आज पर्यंत आमचा अभ्यास बाहेरुन जास्त झाला आहे. तो इतरांच्या नजरेतून झाला आहे. आता आम्ही तो आमच्या नजरेतुन करणार आहोत हाच काय तो फरक असणार आहे. यातून अदिवासिच्या शेती, रोजगार, सहकार, संस्कृती, आरोग्य, अशा विविध अंगानी काम करण्याचा देखील मानस आहे. तसेच आजची शिक्षण व्यवस्था फक्त मजूर तयार करण्याचे कारखाने आहेत. याला पर्याय म्हणून प्रयोगिक तत्वावर मॉडेल म्हणून काम करण्याच्या दृष्टीने प्रि स्कूल राजुर सुरु करत आहोत, असे कॉ स्वप्निल धांडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्रोही विद्यार्थी चे प्रवीण कोंडार यांनी केले, तर आभार किरण मुंढे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा