Breakingजुन्नर : नगर पालिका हद्दीतील दिव्यांग, भूमीहीन बेघर लोकांना घरकुल द्या - प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व बेघर संघटनेची मागणी


जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर नगर पालिका हद्दीतील दिव्यांग, भूमीहीन बेघर लोकांना घरकुल मिळावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती रूग्ण व बेघर संघटनेच्या वतीने जुन्नर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


यावेळी नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले की 500 लोकांच्या घरकुल यादीतील 81 लोकांना घरकुल मंजूर झाले. व लवकरच राहिलेल्यांना घरकुल मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्वांना घरकुल मिळेल, असे आश्वासन दिले.

यावेळी समीर भगत, अंकीता गोसावी, भाऊ कुंभार,  सुवर्णा बनकर, प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक दिपक चव्हाण, अरूण शेरकर, दत्तात्रय हिवरेकर, सौरभ मातेले, स्वप्निल लांडे, राहुल मुसळे, सुनिल जंगम  नफिसा इनामदार, महिला संघटना अध्यक्ष रजनी शहा, उपाध्यक्ष नाजमा बेपारी व महिला संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा