Breakingजुन्नर : डॉ. लता पाडेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक


पुणे / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्याची सुकन्या महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला विभागातर्फे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत डॉ. लता पाडेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या ठरल्या आहेत.


या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याच्या पुरस्कर्त्या चिन्मयी सुमित राघवन यांनी डॉ. पाडेकर यांचे कौतुक केले. 


डाॅ. पाडेकर यांनी 'परीक्षा सर्पांची आणि स्वतःची' या डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित एका घटनेचे तीन मिनिटांत अभिवाचन केले आणि लगेचच अत्यंत आत्मविश्वासाने आणि समाजहित जपणारे आपले सडेतोड मत मांडले. त्यांच्या या प्रभावी आणि अस्खलित वाचनाचे सर्व परीक्षकांनी कौतुक केले.

निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच कार्यक्रमात लगेच त्यांचा व्हिडिओसुद्धा पुन्हा सर्वांसाठी दाखविण्यात आला. प्रमुख अतिथी चिन्मयी सुमित राघवन यांनी देखील प्रस्तुत व्हिडिओतील बारकावे आवडल्याचे जाहीर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा