जुन्नर : पाकिस्तानातील धुळ जुन्नरमध्ये ?
जुन्नर : पाकिस्तानातील कराची येथे मोठे धुळीचे वादळ आले होते. शनिवारी सकाळी पश्चिम पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळाने पाकिस्तानच्या कराचीमधील जनजीवन विस्कळीत केले. तिथली दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी झाली होती. मात्र वायव्य भारतात पुढील 36 तास पश्चिम विक्षोभ खूप सक्रिय असल्याने धुळीच्या वादळाचा दिल्लीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
परंतु हे वादळ गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या दिशेने निघाल्यामुळे त्याचा प्रभाव मुंबई, पुणे शहर परिसरात पहायला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यातही पूर्ण दिवसभर वातावरण धुके पडल्यासारखे गच्च झालेले होते. हे धुके नसून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे पाकिस्तानातील धुळीच्या वादळाचा परिणाम आहे.
जुन्नर आणि आसपासच्या परिसरातील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. सकाळीपासूनच थंडी अधिक जाणवू लागली आणि आता थंडी अजून तीव्र होताना दिसत आहे. हवेमधील धूलिकण वाढल्यामुळे नागरिक, लहान मुले यांना सर्दी, पडसे तापाची लक्षणे वाढली आहेत.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा