Breakingजुन्नर : एकाच दिवशी ४ घरे आणि २ दुकाने चोरट्यांनी फोडली


जुन्नर : बेल्हे येथील गावठाणात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ऐन थंडीत नागरिक गाढ झोपेत असताना चोरट्यांनी बंद घरे व दुकाने यांना लक्ष्य करीत एक फोटोग्राफी दुकान, सरकारी ठेकेदाराचे कार्यालय व चार बंद घरांची कुलूपे तोडल्याची घटना घडली असून त्यामुळे बेल्हे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.


याविषयी अधिक माहिती अशी की, बेल्हे गावातून जाणाऱ्या अळकुटी रस्त्यालगतच शासकीय कामाचे ठेकेदार सागर ताजवे यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून दोन्ही कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यापैकी काही कपडे, साड्या व एक महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम असलेली बॕग नेल्याचे ताजवे यांनी सांगितले. 


तसेच हरी फोटोग्राफी याही दुकानाचे कुलून तोडून अंदाजे ४५००० रुपयांचा एक कॕमेरा नेल्याचे दुकानाचे मालक हरी नायकवाडी यांनी सांगितले. तसेच येथील नबाबगढीसमोर राहणारे गवांदे कुटूंबाचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले असून गवांदे कुटूंब बाहेरगावी असल्याने चोरीचा तपशील समजला नाही. त्यांच्याच शेजारी राहणारे फकीर बेपारी यांच्याही बंद असलेल्या दोन घरांची कुलपे तोडली. परंतु त्यातून काहीही चोरीला गेले नाही, असे बेपारी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या सर्व चोरीच्या घटना कुलूपबंद असलेल्या दुकाने व घरांच्या झाल्या असून चोरी करताना चोरट्यांनी आजुबाजूच्या घरांना कड्या लावल्याचे नागरीकांच्या बोलण्यातून समजले. तसेच सध्या पडणाऱ्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी रस्ते लवकरच निर्मनुष्य होत असल्याने चोरट्यांना आपला कार्यभाग साधण्यास कोणतीही अडचण येत नसल्याचे दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा