Breaking
आकुर्डीतील खंडोबा यात्रा रद्द - विठ्ठल काळभोर


पिंपरी चिंचवड : दरवर्षी आकुर्डी गावातील खंडोबामंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक मोठ्या प्रमाणात  येतात. दरवर्षी पौष शुद्ध षष्ठीला आकुर्डीच्या या ग्रामदैवताची यात्रा भरते. दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात.


यावर्षी पुन्हा कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे ही ८ आणि ९ जानेवारी रोजी यात्रा भरणार नसल्याने किरकोळ व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. तसेच, सकाळी होणारी आरती किंवा महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार नाही. मंदिरात केवळ अभिषेक होणार आहे. मंदिर विश्वस्तांच्या उपस्थितीत पालखी निघणार आहे.


कुस्तीचा आखाडा यावर्षी भरणार नाही. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले असून, शासकीय सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर यांनी सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा