Breaking

खेड सेझ १५ % परतावा प्रश्न त्त्वरीत सोडवू आणि परतावा धारक शेतकऱ्यांना न्याय देऊ - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन


मुंबई : शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी मंत्रालयात दुपारी ३ ते ४  या वेळेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हरेश देखणे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.

          
या भेटीमध्ये खेड सेझ १५ % टक्के परतावा. प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हरेश देखणे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने खालील प्रमुख बाबी उद्योग मंत्री सुभाष देसाई त्यांच्यासमोर मांडल्या.


१. खेड सेझ प्रकल्पांतर्गत असणारा तेरा (१३) वर्षी पेक्षा अधिक प्रलंबित असणारा पंधरा टक्के परतावा प्रश्न त्वरित सोडवला जावा.

२. १५ % परताव्यासाठी सध्या निवडलेली जागा. बदल करून शेतकऱ्यांच्या सोयीची सपाट जागा देण्यात यावी. 

३. एम.आय.डी.सी. मार्फतच (शासनामार्फतच ) १५ % टक्के परतावा प्रश्न मार्गी लागावा.

४. १५ % टक्के परतावा. प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी, उद्योग मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आय.डी.सी, के.डी.एल प्रतिनिधी, के. ई. आय.पी.एल प्रतिनिधी, १५ टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी, आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक त्वरित घेण्यात यावी. व या प्रश्नावर एकदाचा ठोस निर्णय घेण्यात यावा.


५. खाजगी पातळीवर कुठल्याही प्रकारे परतावा जमिनीचे व्यवहार होऊ नये. शासकीय पातळीवरच व्यवहार होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा.

यावर उद्योगमंत्र्यांनी सुभाष देसाई सकारात्मक भूमिका घेत. प्रथम एम.आय.डी.सी.ची या १५%परतावा प्रश्न संदर्भात शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊ! त्यानंतर त्या ठिकाणी ठोस निर्णय झाल्यानंतर उद्योगमंत्र्यांन यांच्याबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू.

शेतकऱ्यांना खूप प्रदीर्घ या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागला. मला माहिती आहे. परंतु शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. त्यांना योग्य न्याय देऊ आणि परतावा प्रश्न मार्गी लावू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


पंधरा टक्के परतावा प्रश्नासाठी खेड सेझ परतावा धारक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून निवेदने देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी (आमदार, खासदार) या प्रश्नासाठी पुढाकार का? घेत नाही,? हा शेतकऱ्यांचा यानिमित्ताने खरा प्रश्न आहे.

प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, निलेश म्हसाडे, विश्वास कदम, भानुदास नेटके, काशिनाथ हजारे, सुदामराव तांबे, दादाभाऊ जैद, उत्तमराव कान्हूरकर, गणेश कान्हूरकर, सुदामराव शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा