कोल्हापूर / आनंद कांबळे : ज्येष्ठ विचारवंत आणि लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
प्रा. एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच बोलणे बंद झाले होते, ते उपचारासही ते फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. आज त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
एन. डी .पाटील यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
- १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
- १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
- १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
- १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
- महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेतेे
मिळालेले सन्मान / पुरस्कार
- स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
- विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
- शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
- समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
- अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा – अध्यक्ष
- जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
- म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर – अध्यक्ष
- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
- महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
- शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र - - सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
- कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
- शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि
- महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
- शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
- शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
- नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा