Breaking

नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणीनागपूर : विमुक्त भटके ओबीसी व विशेष मागासप्रवर्ग यांचा सर्वांगीण विकासाचा हेतू समोर ठेवून महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. विकासापासून दूर असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात मदत करण्यासाठी महाज्योतीने मे २०२१ ला ५०० विद्यार्थ्यांना फिलोशिप शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली होतीे. कालांतराने संस्थेने सरसगट पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना घेण्याचे आश्वासन दिले. मात्र नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी हताश झाले आहे.


नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीने प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा