Breaking

पिंपरी चिंचवड : कॉम्रेड एन. डी. पाटील आणि डॉ.रमेश कांबळे यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली !


पिंपरी चिंचवड : कामगार संघटना संयुक्त कृती आणि शहरातील विविध श्रमिक,पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने दिवंगत कॉम्रेड एन. डी. पाटील आणि कॉम्रेड डॉ. रमेश श्रीपती कांबळे यांना श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.


माकप,भाकप, इंटक, सिटू, आयटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती पक्ष सह विविध संस्था संघटनांच्या विविध नेत्यानी एन. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.


जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे इंटक चे कामगार नेते डॉ. कैलास कदम, मारुती भापकर, आयटकचे कॉम्रेड अनिल रोहम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड लता भिसे, ऍड. मनीषा महाजन, सिटूचे कॉम्रेड गणेश दराडे, फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, शिवश्री नीरज कडू, प्रहार जनशक्ती पक्ष महेश कनकुरे, महाराष्ट्र श्रमशक्ती संघटना बाळासाहेब थोरवे, उमेश धर्मगुत्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी प्रा. कॉम्रेड एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच त्यांनी शेतकरी, कामगार, पक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर शोषित कामगार शेतकरी कष्टकरी यांचे नेतृत्व केले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध आंदोलनं उभी केली. शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी सतत त्यांची धडपड असायची त्यांनी दिवंगत कॉमेडी गोविंद पानसरे यांच्या सोबत शेतकरी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा साठी मोठी चळवळ उभी केली. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले‌.


पुरोगामी विचारांचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलन घेतली. तसेच पुस्तके लिहिली त्या माध्यमातून ते नेहमीच तरुण कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत होते आणि त्यांचे अस्तित्व अजूनही राहील यात काही शंका नाही.

कॉम्रेड एन. डी. पाटील यांच्या नावाने पुरस्कार आणि कार्यकर्ता शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे विचार मांडण्यात आले. तसेच त्यांचे अपूर्ण कार्य पुढे चालू ठेऊन कामगार कष्टकऱ्यांचा लढा यशस्वी केला, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन डॉ. कैलास कदम, मानव कांबळे, आणि मारुती भापकर, कॉम्रेड अनिल रोहम यांनी आभार मानले.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा