Breaking

पिंपरी चिंचवड शहरातील बैलगाडा घाटांची दुरूस्ती होणार - राहुल जाधव


माजी महापौर, नगरसेवक राहुल जाधव यांच्या उपसुचनेला मनपा सभेची मान्यता


पिंपरी चिंचवड : संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आवडीचा ग्रामीण खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. या बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने नुकतीच उठवली आहे, गेली सात वर्षे या शर्यती बंद होत्या त्यामुळे शहरातील बैलगाडा घाटांची दुरावस्था झाली होती. हे बैलगाडा घाट शर्यत घेण्यायोग्य नाहीत. ग्रामीण भागामध्ये चऱ्होली, तळवडे, चिखली, जाधववाडी, भोसरी या ठिकाणच्या बैलगाडा घाटाना विशेष महत्व आहे म्हणून माजी महापौर राहुल जाधव यांनी उपसुचने द्वारे महासभेमध्ये दुरुस्तीची मागणी केली होती.


नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी उपसुचनेला अनुमोदन दिले. पिंपरी चिंचवड शहरातील बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या दि.20 जानेवारी रोजी महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सभेमध्ये या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. 


भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर राहुल जाधव यांच्या मागणीला यश आले. लवकरच या बैलगाडा घाटांच्या दुरुस्ती सुशोभीकरणाचे काम चालु होईल, असे राहुल जाधव यांनी सांगितले.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा