Breaking
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पत्रकार दिन समारंभ संपन्न


हडपसर / डॉ.अतुल चौरे : पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता सुरू केली. समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी. मुखवटे धारण करणारी पत्रकारिता नसावी. समताभाव निर्माण करणारा विचार  वर्तमानपत्रातून व्यक्त झाला पाहिजे. असे विचार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी व्यक्त केले. 


एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन समारंभात आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग व मास कमुनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.


अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे बोलत होते. ते म्हणाले की, लोकशाही संस्कृतीला पोषक जबाबदार नागरिक तयार करण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम पत्रकार करतात. बाळशास्त्री जांभेकरांनी ज्ञान प्रसारासाठी, लोककल्याणासाठी दर्पण सुरू केले, असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

उपप्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी पत्रकारांनी  निष्पक्षपाती पणाची भूमिका घ्यावी. असे सांगून सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी केले. 


पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ.नम्रता मेस्त्री, प्रा.शुभम तांगडे यांनी केले. आभार डॉ. संदीप वाकडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा