Breakingपुणे : मृदुला मेहेर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात २२ वीजुन्नर / आनंद कांबळे : नारायणगाव येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कुलची विद्यार्थिनी कुमारी मृदुला मंगेश मेहेर हिने इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 22 वा क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल जुन्नर तालक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वतीने तिचा व पालकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.


मृदुलाने यापूर्वी इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा आदि स्पर्धात्मक परीक्षेत देखील दैदिप्यमान यश संपादन केले असून शाळेत इयत्ता पहिलीपासून आजपर्यंत सतत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. तिला भविष्यात वैद्यकिय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे मृदुलाने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा