Breaking

मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या "त्या" फोटो मागील वाचा सत्य !


मुंबई : सध्या एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये ते दोघे शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत. आता या फोटोवर उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.


विशेषतः या फोटोच्या संदर्भात यूपी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत, तसेच हा फोटो शेअर करून ओवेसी भाजपची बी टीम असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.या फोटोची तपासणी केली असता हा फोटो फेक असून एडिट केलेला आहे. या मूळ फोटोमध्ये ओवेसी नसून मुलायमसिंह यादव हे मोहन भागवत यांच्यासोबत बसले आहेत. हा मूळ फोटो २०२१ मधील असून मूळ फोटोतून यादव यांना एडिट करून त्यांच्या जागी ओवेसींचा फोटो जोडण्यात आला आहे. 

 


हा मूळ फोटो उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या सरकारी निवासस्थानी डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आला होता. त्यावेळी या फोटोची खूप चर्चा झाली होती, यावरून यूपी काँग्रेसनेही समाजवादी पक्षावर टिका केली होती. तसेच मोहन भागवत और मुलायम सिंह यादव यांचा हा मूळ फोटो अर्जुन राम मेघवाल यांनी देखील २० डिसेंबर २०२१ रोजी ट्वीट केला होता. त्यामुळे शेअर झालेला हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा