Breaking


आदिवासी वाड्या रस्त्यांवरील रस्ते त्वरित दुरुस्ती करावेत - बिरसा ब्रिगेड आंबेगावची मागणी


आंबेगाव : आदिवासी भागातील गाव वाड्या वस्त्यांवरील रस्ते नादुरुस्त आहेत. पावसामुळे या रस्त्यांची दूरावस्था  झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी बिरसा ब्रिगेड आंबेगावच्या वतीने आज पंचायत सामिती आंबेगावचे गटविकास अधिकारी पठारे यांना निवेदन देण्यात आले.


आंबेगाव तालुक्यातील खराब कच्चे रस्ते :

१) मेनुंबरवाडी ते भांगले वाडी
२) मेनुंबरवाडी ते आंबे
३) बोरघर - घोडेवाडी ते माळवाडी
४) वरसावणे
५) कुंभेवाडी ते ढवळेवाडी
६) माळीनफाटा ते कुंभेवाडी  २ की. मी
७) कुंभेवाडी ते आंबे
८) डोन कापर वाडी ते हतवीज
९) घोणेमाची वाघोबावाडी , पारधी वस्ती


१०) ढगेवाडी  ते कोंढवळ
११) जांभोरी काळवाडी नं.२ ते भोकटे वस्ती ३ की. मी
१२) पिंपरी ते .... वस्ती
१३) सावरली गावापासून १.५ की. मी
१४) वैद वस्ती ते गाडेकर वाडी
१५) पसारवाडी ते लेंभेवाडी
१६)राजपूर ते खेड तालुका जोड रस्ता
१७) फुलवडे  भारमळ वस्ती मंदिर ते वांदरवाडी वस्ती


अशा अनेक गावांतील रस्त्यांची स्थिती वाईट आहे. जिथे रस्त्याचे काम व इतर कामे चालु आसतात तिथे  काम सुरु असताना माहिती फलक लावले जात नाही, जनतेला समजत नाही, प्रशासन नियमाचे उल्लंघन करतेय, याकडे सत्तेवर असलेले व विरोधक लक्ष देत नाहीत. त्यामुळे कामे निकृष्ट होतात, असेही म्हटले आहे.
             
यावेळी बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुका उपाध्यक्ष दिनेश गभाले, मातृशक्ती प्रमुख उमाताई मते, मिडिया प्रमुख संतोष तिटकारे, अमोल भारमळ आणि बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा