Breakingकेरळमधील इडुक्की येथे एसएफआयच्या कार्यकर्त्याची हत्या, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक

Photo Credit : ANI


इडुक्की, ता. १० : केरळच्या इडुक्की येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कार्यकर्ता धीरज राजेंद्रन याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एसएफआयचे आणखी दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. 


कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेची शांततेत निवडणूक पार पडली, त्यानंतर हा हल्ला झाला. हा हल्ला युवक काँग्रेस - केएसयूने केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. 

 


"धीरज राजेंद्रन याच्या हत्येप्रकरणी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे," या संबंधीचे वृत्त एएनआयने दिले आहे.


दरम्यान, धीरजच्या सन्मानार्थ एसएफआयने देशभरात ११ जानेवारी रोजी अखिल भारतीय निषेध दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा