Breaking
सातारा : केरळमधील एसएफआय कार्यकर्ता धीरज राजेंद्रनच्या हत्येचा निषेध !


सातारा : केरळच्या इडुक्की येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कार्यकर्ता धीरज राजेंद्रन याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एसएफआयचे आणखी दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. याच्या निषेधार्थ एसएफआय सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने वडगाव ता. खटाव येथे निषेध व्यक्त करत अभिवादन करण्यात आले.


यावेळी एसएफआय राज्य कमिटी सदस्य सायली अवघडे, मोनिका फाटक, अश्विनी घार्गे, धनंजय घार्गे, साक्षी घार्गे, सानिका सुतार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, धीरजच्या सन्मानार्थ एसएफआयने देशभरात आज ११ जानेवारी रोजी अखिल भारतीय निषेध दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा