कोविड ( लाट तिसरी ) बाबत डॉ. समीर अहिरे काय म्हणतायेत पहा ! अपडेट नव्याने
बघता बघता कोविड ने जनमाणसाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. दिवसाला 2 लाखाहून अधिक ( ज्यांनी तपासणी केली आहे असे, न तपासलेले कितीतरी पटीने ) रुग्ण सापडत आहेत.
एक मात्र खरं की दुसऱ्या लाटेत ज्या प्रमाणे संख्या वाढायला सुरुवात होताच एडमिशन admission देखील वाढले होते, अक्षरशः तयारी करण्यासाठी देखील वेळ मिळाला नव्हता, या वेळी तसं होताना दिसत नाहीये.
बरेच पेशंट ( साधारण 90 -95% ) साध्या व्हायरल सारखे लक्षणं दाखवत आहेत आणि साध्या व्हायरल च्या उपचाराने बरे ही होत आहेत, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.
परंतु या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यात एक गल्लत होत आहे की लक्षण साधी आहेत म्हणून जास्तीत जास्त लोकं टेस्ट करण्याचं टाळत आहेत, त्यासाठी ची कारणं ही मोठी मजेशीर आहेत.
माणसांची मजेशीर कारणं :
- नाही ओ, डॉक्टर थोडं वातावरण बदललं
- टेस्ट केली की पॉजिटीव्ह च येते
- उगीच टेस्ट पॉजिटीव्ह आली तर टेन्शन
- टेस्ट पॉजिटीव्ह आली तर विनाकारण औषधं घ्यावे लागतील
- टेस्ट पॉजिटीव्ह आली तर इतरांच्या ही टेस्ट कराव्या लागतील
- टेस्ट पॉजिटीव्ह आली तर घरातले काम कोण करणार?
- मी पॉजिटीव्ह आलो / आली तर माघे बघणारं कोणीच नाही.
अशी अजून भरपूर यादी वाढवता येईल पण यासगळ्यात खरतर आपला निष्काळजीपणा दिसत आहे.
ही चांगली गोष्ट आहे की लक्षण खूप गंभीर नाहीत , परंतू अजून आपल्या घरातील लहान मुलं ज्यांचे अजून वॅक्सिनेशन ही झालेले नाही आणि इतर दुर्धर आजार ( comorbid ) असलेले जेष्ठ मंडळी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. आपल्या निष्काळजी वागण्याचा परिणाम त्यांना भोगावा लागू नये अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा असणार आहे.
तेव्हा आता काय केलं पाहिजे ?
- सर्व प्रथम कोविड टाळण्याच्या सामान्य विज्ञानाचा अवलंब करावा
- गर्दीत जाणं टाळावं
- हात वारंवार धुवावेत
- मास्कचा कटाक्षाने वापर करावा.
- वॅक्सिन घेतले नसेल तर त्वरित घ्यावे.
- लक्षणं दिसताच, स्वतःला इतरांपासून विलग करून घ्यावे ,
- RTPCR टेस्ट करावी ( लक्षणं किती ही सौम्य असली तरी )
- पॉजिटीव्ह आल्यास घरातील इतरांची टेस्ट करून घ्यावी
- लक्षणांच्या तीव्रतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत
- पॉजिटीव्ह व निगेटिव्ह यांच्या विलगिकरणाची व्यवस्था करावी.
वैद्यकीय क्षेत्राकडून अपेक्षा
- icmr ने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार लॅब टेस्ट व उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
- रुग्णांच्या योग्य समुपदेशनाची व्यवस्था करावी.
शासकीय पातळीवर देखील काही बदल करण्याची गरज
- तपासण्याची संख्या वाढवावी
- अफवा अथवा चुकीची माहिती, विधानं करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करायला हवी मग तो सामान्य माणूस अथवा लोकप्रतिनिधी.
- पॉजिटीव्ह आलेल्या रुणांची संख्या जाहीर करू नये कारण ही संख्या समान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते, त्याने ज्यांच्याकडे पैसे किंवा इन्शुरन्स आहे, असे रुग्ण या भीतीच्या वातावरणात बेड अडवून ठेवायची शक्यता आहे.
- पण जर संख्या जाहीर झालीच नाही आणि वैयक्तिक त्या व्यक्तीला रिपोर्ट कळवला गेला, तर तो व्यक्ती लक्षणांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊ शकतो, यामुळे जो घरी राहून ठीक होऊ शकतो त्याला तसा उपचार आणि ज्यांना खरोखर admission ची गरज आहे. त्यांनाच दाखल करून घेता येईल, आणि योग्य त्या व्यक्तीला बेड आणि इतर संसाधन ( ऑक्सिजन पासून औषधांपर्यंत ) मिळून मृत्यूचं प्रमाण कमी करता येईल.
- तसेच Admit होणाऱ्यांची आणि मृत्युंची संख्या मात्र जाहीर करावी.
हे एक राष्ट्रीय संकट
याकडे स्वतःच्या फायद्याची संधी म्हणून बघण्यापेक्षा लोकमदतीची संधी म्हणून राजकारणी, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य माणसाने बघितलं तर आपण या अग्नीकुंडातून सहीसलामत बाहेर पडू यात शंका नाही.
डॉ. समीर अहिरे,
नाशिक
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा